तीन लाख किमतीचे खाद्यतेल जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

सोलापूर - खाद्यतेलाच्या पाकिटावर आक्षेपार्ह मजकूर असल्याचे समजल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील मे. अडाणी विल्मर लि. या खाद्यतेल कंपनीच्या गोदामावर छापा टाकून तीन लाख सात हजार 740 किमतीचे खाद्यतेल जप्त केले आहे.

गोदामात दोन प्रकारच्या तेलाचा साठा विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. या खाद्यतेलाच्या पाकिटावर कायद्यामध्ये केलेल्या तरतुदीचे उल्लंघन करणारा मजकूर छापला होता. तपासणीसाठी तेलाचे नमुने घेण्यात आले आहेत. या प्रकरणात उत्पादकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्याचा खुलासा व तपासणीसाठी पाठविलेल्या तेलाच्या नमुन्याचे विश्‍लेषण आल्यानंतर कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं. भा. नारागुडे यांनी दिली.