नगरमध्ये सापडल्या एक कोटींच्या जुन्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

संजय नामदेव शेलार (रा. बायजाबाई सोसायटी, सावेडी) यांच्या घरात एक हजाराच्या नोटा असलेले 60 लाख 26 हजार आणि 500 च्या नोटा असलेले 39 लाख 72 हजार 500 रुपये सापडले.

नगर - नगरमधील सावेडी भागात आज (रविवार) सकाळी संजय शेलार यांच्या घरात सुमारे एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. या प्रकरणी चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय नामदेव शेलार (रा. बायजाबाई सोसायटी, सावेडी) यांच्या घरात एक हजाराच्या नोटा असलेले 60 लाख 26 हजार आणि 500 च्या नोटा असलेले 39 लाख 72 हजार 500 रुपये सापडले. सर्व नोटा जुन्या चलनातील आहेत. शेलार यांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. जुन्या नोटांची ही एकूण रक्कम 99 लाख 98 हजार 500 रुपये इतकी आहे.

नगरचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखआली तोफखाना पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून ही रक्कम जप्त केली आहे.