मोटारीने दहा जणांना उडविले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

उंडाळे - कऱ्हाड-चांदोली रस्त्यावरील टाळगाव बस स्थानकाजवळ गणपतीपुळ्याहून पुण्याकडे जात असलेल्या मोटारीने चार दुचाकी आणि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दहा जणांना उडविले. त्यापैकी सूर्यकांत जगन्नाथ साठे (वय 54) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. 

आज दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

घटनास्थळावरील माहिती अशी ः पुण्यातील जोशी कुटुंबीय गणपतीपुळे येथून देवदर्शन करून चांदोलीमार्गे मोटारीतून (एमएच 14 ईवाय 0694) पुण्याकडे निघाले होते. त्यांची गाडी टाळगावनजीक आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे रस्त्याकडेला असलेल्या चार दुचाकी आणि बसथांब्याजवळ बसलेल्या व उभ्या असलेल्या सुमारे दहा जणांना तिने उडवले. जखमींमध्ये अमोल पतंगराव जाधव (22), जगन्नाथ वसंतराव पाटील (44), चंद्रकांत रघुनाथ पवार (40), स्वप्निल राष्ट्रपाल माने (23), अनिकेत गौतम माने (18), ओंकार श्रीकृष्ण जाधव (17), देवराज सचिन आडके (12) यांचा समावेश आहे. मोटारीमधील दोन लहान मुली जखमी आहेत. तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. टाळगाव बस स्थानकावर मांसविक्रीचे दुकान आहे. ते आज बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

टॅग्स

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - डॉल्बीला ठोसा देण्यासाठी येथील तरुणाईनेच ढोल-ताशा पथकांची निर्मिती केली आहे. यंदा कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण...

04.45 AM

कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक पद्धतीवर कायदा करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर मुस्लिम...

04.39 AM

कोल्हापूर  - नायलॉन, सूत घेऊन चामड्याच्या दोरीला करकचून पीळ द्यायचा. हा पीळ इतका कठीण करायचा की, चामडे किंवा फायबर...

03.42 AM