पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाइन सीईटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

कोल्हापूर - साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आणि यशवंत ॲकॅडमीतर्फे शुक्रवारी (ता. ५) ऑनलाइन सीईटी परीक्षा होणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी सीईटी होत असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

सकाळ माध्यम समूह या उपक्रमाचे प्रायोजक आहे. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना ही सीईटी उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी नोंदणी dypatil.conducttest.com या संकेतस्थळावर करायची आहे. परीक्षेसाठी लागणारा लॉगीन आयडी व पासवर्ड हा विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून ही परीक्षा द्यायची आहे. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी घरबसल्या त्याच्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा संगणकाव्दारे ही परीक्षा देऊ शकतो. परीक्षेचा निकाल व नमुना उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना त्वरित उपलब्ध होणार आहे. परीक्षेसाठी तीन वेगवेगळ्या प्रश्‍नपत्रिका उपलब्ध असतील. शुक्रवारी (ता. ५)  दुपारी दीड वाजता ऑफलाइन मॉक सीईटी होणार असून विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेच्या अगोदर अर्धा तास उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-८३८०८४९१११

Web Title: online cet exam first time in western maharashtra