ऑनलाईनचा बोजवारा; नोंदी करण्यात दिरंगाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

सांगली - ऑनलाईन नोंदीचा सरकारचा निर्णय चांगला असला तरी सॉफ्टवेअर प्रॉब्लेममुळे अनेक नोंदी झालेल्या नाहीत, याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाचेही लक्ष नाही. तातडीने मंडळ अधिकारी कार्यालयांना नोंदीचे आदेश द्यावेत अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून त्यांच्या दौऱ्यावेळी धरणे आंदोलन करू, असा इशारा गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

सरकारने ऑनलाईन नोंदीचा फतवा काढल्यानंतर वारंवार सॉफ्टवेअर प्रॉब्लेम असल्याचे सांगितले जाते. गेल्या दोन महिन्यांत खरेदी दस्तऐवज, बॅंक बोजाच्या नोंदी, फेरफार नोंदी या ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रॉब्लेममुळे रखडल्या आहेत. ऑनलाईन नोंदीचा पूर्णपणे फज्जा उडालेला आहे. ही व्यवस्था सुरळीत होईपर्यंत सांगली, मिरज, कुपवाड तसेच जिल्ह्यातील सर्व तलाठी कार्यालयांत नोंदी घालण्यासाठी पर्यायी जुनी व्यवस्था अमलात आणावी. 

जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व तहसीलदार, मंडल अधिकाऱ्यांना लेखी आदेश द्यावेत व त्यांची प्रत समितीला द्यावी, अशी मागणी आहे. या निवेदनावर समितीचे शहराध्यक्ष चंदन चव्हाण, उत्तम कांबळे यांच्या सह्या आहेत.

Web Title: Online deletion