The opportunity for election campaign to Sunday for Sangali, miraj and kupwada municipal
The opportunity for election campaign to Sunday for Sangali, miraj and kupwada municipal

सुटीची संधी साधत सांगलीसह मिरज, कुपवाड्यात प्रचाराचा धडाका 

सांगली : नाट्यपंढरी सांगलीसह मिरज, कुपवाड शहरात रविवार सुटीची संधी साधत उमेदवार, पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. वेगवेगळ्या रस्त्यांवरून, गल्ल्यांतून, चौकातून वेगवेगळे झेंडे खांद्यावर घेतलेल्या प्रचार दिंड्या शहरातील वातावरण ढवळून काढत आहेत. प्रचारदिंड्यांनी नाट्यपंढरी दुमदुमली आहे.

सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी 1 ऑगस्ट रोजी मतदान आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होत असून शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, सांगली सुधार समिती, अपक्षांची आघाडी, आप, जनता दल अशा वेगवेगळ्या गट, संघटना, पक्षांनी ताकद लावली आहे. प्रभाग रचना बदलली आहे. प्रभाग दुप्पट, तिप्पट झाले आहेत. लोक नवे, भाग नवा आहे. त्यामुळे घर टू घर प्रचार हा सर्वपक्षिय समान फंडा राबवला जात आहे. रविवारची सुटी असल्याने प्रचाराला बहुतेकांनी पै पाहुणे, मित्र, गोतावळा आणि कार्यकर्ते जमा केले आहेत. परिणामी, ह्यांच्या प्रचार दिंड्या लांबच्या लांब झाल्या आहेत. वाजत गाजत झेंडा फडकावत प्रचार सुरु आहे. अनेक चौकात वेगवेगळ्या प्रचार दिंड्या एकत्र येत असल्याने जणू संगम झाल्याचा भास निर्माण होत आहे.

भाजपने प्रचारासाठी तब्बल वीस रथ मैदानात उतरवले आहेत. शिवसेनेनेही रथ बनवले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिंड्या प्रचार उरकून दुपारी तीन वाजता काँग्रेस भवनजवळ प्रचाराचा नारळ फोडायला जमणार आहेत. सायंकाळी सहा वाजता मिरजेत आघाडीचा प्रचार शुभारंभ आहे. त्याआधी गल्लोगल्ली प्रचार पत्रके आणि उमेदवाराचे मुखदर्शन देण्याचा कार्यक्रम सर्व पक्षांनी पार पाडला. दुपारी जेवन, थोडी विश्रांती आणि सायंकाळी पाचनंतर पुन्हा एकदा सारे बाहेर पडणार आहेत.

कुलुपवाल्या घरांत आजच प्रचार शक्‍य

नोकरी, व्यापार, उद्योगाच्या निमित्ताने शेकडो कुटुंबातील लोक दिवसभर घराबाहेर असतात. सारे एकाचवेळी घरी सापडण्याचा वार म्हणजे रविवार. त्यामुळे कुलुपवाल्या घरांत आजच प्रचार करण्याचा जोर लावण्यात आला होता. अपार्टमेंटच्या पायऱ्या चढून उमेदवार घराघरात जात आहेत. 

हलगीला प्राधान्य

अनेक उमेदवारांनी वाजंत्रीची सोय केली आहे. त्यात हलगी हे वैशिष्ट्य ठरत आहे. अनेक हलगीपटूंना उमेदवारांनी बूक केले आहे. आज चहूकडे हलगीचा सूर कानी पडत होता. ढोल, ताशाही होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com