वेश्‍या दलाल महिलांना ‘पोक्‍सो’ लावण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

सांगली - बेळगाव येथून तीन अल्पवयीन मुलींना वेश्‍या व्यवसायात आणताना अटक झालेल्या दलाल झीनत जमादार (वय ६० वैभवनगर, बेळगाव) व यास्मिन नायकवडी (वय ३८, खंजीर गल्ली, बेळगाव) यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्‍सो) नुसारही कारवाई केली जाणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी हा आदेश दिला.

बेळगाव येथील १३, १६ आणि १७ वर्षांच्या मुलींना वेश्‍या व्यवसायासाठी सांगलीत आणले होते. स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी जेम्स वर्गीस यांनी पोलिसांना प्रकार कळवला. उपअधीक्षक सुहास बावचे यांच्या पथकाने स्टेशन रस्त्यावरील हॉटेल पंचरत्नसमोर जमादार व नायकवडी यांना अटक केली. तीन मुलींची सुटका केली. जमादार व नायकवडी सध्या कारागृहात आहेत.

नायकवडी हिच्या जामीन अर्जावर सरकारी वकील संजय धर्माधिकारी यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायाधीश सौ. सापटणेकर यांनी जामीन फेटाळला. तसेच या गुन्ह्यात पोलिसांनी ‘पोक्‍सो’ कायद्याचे कलम लावले नसल्याबद्दल विचारणा केली. गुन्ह्यात ‘पोक्‍सो’ चे कलम लावा, असे आदेश दिले. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या महिला उपनिरीक्षक एस. एम. यमगेकर तपास करीत आहेत.