स्व:कृतीतून ज्ञान दिंडीचे आयोजन

Organizing self Knowledge Dindhi festival
Organizing self Knowledge Dindhi festival

मोहोळ : पापरी (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बालदिंडीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना वारीचे महत्व, महती, वारिचा स्वअनुभव कृतितुन कळावा या उद्देशाने "उपक्रमातुन थेट ज्ञान" म्हणून या दिंडी सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापक राजेन्द्र परदेशी यांनी सांगितले.

सकाळ पासूनच विद्यार्थी अंगात नेहरू, धोतर, कपाळी वारकरी टिळा, डोक्यावर टोपी, तर कोणी पगडी, गळ्यात पांढरा वारकरी पंचा, टाळ, मृदुंग घालून तर विद्यार्थिनी साड्या, गळ्यात बोरमाळ, डोक्यावर पदर, तुळस घेतलेल्या पेहराव्यात शाळेकडे रवाना होत असताना दिसत होते. शाळेत सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी जमा झाल्यावर पालखी घेवून टाळ मृदुंगच्या गजरात, ज्ञानोबा तुकारामच्या जय घोषात व अभंगाच्या निनादात गावातून विठ्ठल रुक्मिणीचा पेहराव केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीला टमटम मधे उभा करून प्रभात फेरी काढण्यात आली.

गावातील चौका चौकात गोल, उभे रिंगण या बाल वारकऱ्यांनी घातले, शाळेतील कांही शिक्षकांनीही वारकऱ्यांचा पेहराव केला होता. साडी नेसलेल्या डोक्यावर तुळस घेतलेल्या मुलींनी व मुलांनी फुगड़ी यांसारखे वारकरी खेळ व उड्याही केल्या. शाळेतील या बाल वैष्णवांच्या दिंडीने गावकऱ्यांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. गावात बाल आवाजातील अभंग, ज्ञानोबा माउलीच्या घोषणेने व टाळ मृदुंगाच्या निनादाने पंढरपुरातील वातावरण निर्मिति झाली होती.

या बाल दिंडीतील पालखीमधे, विविध शास्त्रज्ञाची पुस्तके, विविध वृक्षांची रोपे ही ठेवण्यात आली होती, दिंडीत संत गाडगेबाबांच्या वेशात एका विद्यार्थ्याच्या हातात गाडगे, व खराटा दिला होता. शाळेने या उपक्रमातुंन विद्यार्थ्यांना दिंडी व वारीचा अनुभव व शिक्षण तर दिलेच पण ग्रामस्थांनाही ग्राम स्वच्छता, व वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा ही धड़ा दिला आहे. तसेच ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषा प्रमाणे विद्यार्थी विद्यार्थिनी हे मूली वाचवा, शौचालय बांधा आदी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या घोषणा देत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com