'ब्रेन डेड' झालेल्या युवकाचे अवयव दान

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

मुलाचा जिव वाचवु शकणार नाही परंतु त्याचे अवयव दान केल्यास दुसऱ्या व्यक्तीचा जिव वाचेल या आशेने मुलाच्या वडिलांनी अवयव दानाचा निर्णय घेतला

सोलापुर- अवयवदानाबद्दलची लोकांमधील जागृती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचे आणखी एक उदाहरण आज (रविवार) दिसून आले. सोलापुर जिल्ह्यातील शिवपार्थ शिवशंकर कोळी (वय14) हा युवक उष्माघाताने बेशुद्ध झाल्याने त्याला शनिवारी दुपारी सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.
 
उपचारादरम्यान हा युवक 'ब्रेन डेड' झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब कुटुंबियांना कळवली. मुलाचा जिव वाचवु शकणार नाही परंतु त्याचे अवयव दान केल्यास दुसऱ्या व्यक्तीचा जिव वाचेल या आशेने मुलाच्या वडिलांनी अवयव दानाचा निर्णय घेतला.त्यानुसार आज (रविवारी) दुपारी कुंभारी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात अवयव काढण्याची प्रक्रिया केली जात आहे.

या युवकाची एक किडनी सोलापुरातील एका गरजू रुग्णाला देण्यात येणार आहे तर दुसरी किडनी व लिव्हर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील रुग्णांना दान करण्यात येणार आहे. तसेच त्याचे हृदय पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथील रुग्णाला दान करण्यात येणार आहे.रविवारी सायंकाळी एअर अॅम्ब्युलन्सने ने हृदय पुण्याला पाठवण्यात येणार आहे 

 

टॅग्स