ओवीसींना मानपत्र देण्याचा फेर प्रस्ताव 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सोलापूर: एमआयएमचे संस्थापक आणि खासदार ऍड. अससुद्दीन ओवीसी यांना सोलापूर महापालिकेने मानपत्र द्यावे, असा फेरप्रस्ताव एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांनी दिला आहे.  

सोलापूर महापालिकेत योगगुरू रामदेवबाबा यांना मानपत्र दिल्याचे प्रकरण गाजत आहे. ठराव झाला नसतानाही ही कारवाई झाल्याने सत्ताधारी भाजपमधील पक्षनेते व नगरसेवकांनीच महापौर व इतर नगरसेवकांना घरचा आहेर दिला होता. 

श्री खरादी यांनी गेल्याच महिन्यात हा प्रस्ताव दिला होता. मात्र पोटनिवडणुकीचे कारण देत तो अजेंड्यावर घेण्यात आला नव्हता. वास्तविक पहाता पोटनिवडणुक व या प्रस्तावाचा परस्पर संबंध नव्हता. आचारसहितेच्या कालावधीत रामदेवबाबाना मानपत्र ठराव नसताना देण्यात आले. त्याच वेळी ओवेसींचा प्रस्ताव मात्र दाखल करून घेण्यात आला नाही. त्यामुळे एम.आय.एम.च्या नगरसेवकानी संताप व्यक्त केला होता. आता दुसऱ्यावेळी प्रस्ताव वेळेत देण्यात आला आहे. तो अजेंड्यावर घेणे कायद्याने बंधनकारक आहे.

श्री. खरादी यांनी प्रस्ताबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, "ऍड. ओवेसी यांना आदर्श खासदार म्हणून गौरविण्यात आले आहे. हैदराबादमध्ये एम.आय.एम.च्या वतीने रुग्णालये चालविली जातात. अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. त्याचा लाभ कोट्यवधी भारतीयांना झाला आहे. त्याची दखल घेऊन सोलापूर महापालिकेने मानपत्र देऊन यथोचित सन्मान करावा असे फेरप्रस्तावात म्हटले आहे. तो अजेंड्यावर न घेतल्यास थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार आहे. "

Web Title: owaisi Solapur Municipal Corporation Certificate