पडळकर - देशमुख यांची बंद खोलीत चर्चा

पडळकर - देशमुख यांची बंद खोलीत चर्चा

आटपाडी - युवा नेते गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांची दिघंची येथे बंद खोलीत चर्चा झाली. श्री. पडळकर यांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या विरोधात केलेले बंड आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते. 

गेल्या दहा दिवसापूर्वी श्री. पडळकर यांनी भाजपचे खासदार श्री. पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यापुढे केवळ आरक्षणाच्या प्रश्नावर काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर श्री. पडळकर यांनी जिल्हाभर दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील सर्व पक्षातील नेते मंडळीची भेट घेण्याचे काम सुरू केले आहे.

बसवराज पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर दिघंची येथे छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाच्या आरतीसाठी आल्यावर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव  देशमुख यांची भेट घेतली.

यावेळी प्रशांत गवळी, ज्येष्ठ नेते कल्लाप्पा कुटे, मल्हारी बुधावले, समाधान भोसले, बळीराम रणदिवे, अण्णासाहेब जाधव, रोहित देशमुख, विनोद पुसावळे, महेश देशमुख, ऋतुराज देशमूख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. पडळकर यांनी हणमंतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली. या चर्चेचा तपशील मिळू शकला नाही मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी आणि परिस्थितीवरच चर्चा झाली असल्याची चर्चा आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com