रामदासभाई, आता तुम्हीच सोडवा प्रदूषणाच्या विळख्यातून!

रामदासभाई, आता तुम्हीच सोडवा प्रदूषणाच्या विळख्यातून!

कोल्हापूर - कोल्हापूरला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. पंचगंगेचे वाढते प्रदूषण, झूम प्रकल्पातील कचऱ्याचा महाडोंगर, शिराेळमधील वाढते कर्करुग्णांचे प्रमाण ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रदूषण महामंडळ आणि प्रशासन यांची अनास्था या प्रश्‍नांच्या सोडवणुकीत कुठेतरी अडथळा ठरते आहे. 

आता हा विळखा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी तोडावा आणि कोल्हापूरला मुक्त करावे, अशी आर्त हाक शहरातील पर्यावरणप्रेमींनी दिली आहे. या साऱ्या प्रश्‍नांबाबत श्री. कदम यांच्या उपस्थितीत उद्या (ता. २) आढावा बैठक होणार आहे. त्यात कठोर कृतीची अपेक्षा पर्यावरणप्रेमी बाळगून आहेत. 

कचऱ्याच्या डोंगराचे काय?
कोल्हापूर महापालिकेने कसबा बावडा येथील झूम प्रकल्पाच्या जागेत कचऱ्याचा महाडोंगर उभा केला आहे. तो डोंगर कोणत्याही प्रक्रियेविना पडून आहे. महापालिकेने सायंटिफिक लॅंडफिल्ड साईट टाकाळा येथे तयार केली आहे; पण तेथे केवळ इनहर्ट मटेरियलच टाकायचे आहे. टोप खाणीचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबितच आहे. त्यामुळे कचऱ्याचा डोंगर नष्ट करायचा कसा, त्यापासून होणारे प्रदूषण रोखायचे कसे, याबाबत पर्यावरणमंत्र्यांच्या बैठकीत काही निर्णय होतो का, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे.

साथीचे आजार
दरवर्षी जानेवारीनंतर पंचगंगेच्या प्रदूषणाची तीव्रता वाढते. काविळीसह अन्य जलजन्य आजार या काळात डोके वर काढतात. गेल्या दोन वर्षांत अशा जलजन्य आजारांनी इचलकरंजी हैराण झाली आहे.

महापालिकेने घेतली एसटीपी प्रकल्पाची चाचणी
पर्यावरणमंत्री बैठक घेणार म्हटल्यावर महापालिकेने तत्परता दाखवत दुधाळी नाल्यावरील १७ एमएलडीच्या एसटीपी प्रकल्पाची आज चाचणी घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकल्पाचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com