लाखाची लाच घेताना कृषी अधिकाऱ्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

पंढरपूर - ठेकेदाराला काम पूर्णत्वाचा दाखला व अनामत रक्कम परत देण्यासाठी एक लाख रुपये लाच घेताना सांगोला येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक सुरेंद्रकुमार श्रीरंग शिंदे, (वय 54, रा. सुपणे ता. कराड), सांगोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक दिलीप दत्तात्रय पंचवाडकर (वय 55, रा. हरिदास वेस, पंढरपूर) या दोन कृषी अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येथे रंगेहात पकडले. याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडून दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली जात आहे. 