ऑनलाईन पद्धताने मतदानाचा विचार सुरू - आयुक्त सहारिया 

ऑनलाईन पद्धताने मतदानाचा विचार सुरू - आयुक्त सहारिया 

पंढरपूर - "मतदानाविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण झाल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊ लागली आहे. इतर देशांप्रमाणे भारतातदेखील यापुढील काळात ऑनलाइन पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवली पाहिजे. त्या दृष्टाने विचार सुरु आहे,' असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस.सहारिया यांनी आज सांगितले.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूूमीवर सहारिया आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. "सध्या मतदानाची टक्केवारी वाढत आहे. निवडणूक खर्च कमी करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने मतदान घेणे सोपे होणार आहे. इतर अनेक देशामध्ये ऑनलाइन पद्धतीचा वापर करुन निवडणूका घेतल्या जातात. परंतु अशा पद्धतीमध्ये इंटरनेट हॅकिंगचे धोके तपासावे लागतील. त्यापूर्वी या प्रक्रियेविषयी अधिक खोलात जाऊन अभ्यास करणे आवश्‍यक आहे,' असे सहारिया म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com