'श्री विठ्ठल सशुल्क दर्शनाला विरोध न करता पाठींबा द्यावा'

अभय जोशी
गुरुवार, 20 जुलै 2017

पंढरपूरः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक वर्षांपासून पैसे घेऊन सोडले जाते. दर्शनाचा बाजार अनेक वर्षांपासून सुरु आहे. हा दर्शनाचा बाजार बंद व्हावा यासाठी कधी कोणत्याही महाराजांनी आवाज उठवला नाही आणि आता तीच मंडळी मंदिर समितीने सशुल्क दर्शन व्यवस्थेचा ठराव केल्यावर विरोध करत आहेत. त्यांनी वस्तुस्थिती समजावून घेऊन विरोध न करता सशुल्क दर्शनाला पाठींबा द्यावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे यांनी केले आहे.

दरवर्षी सुमारे अडीच लाख भाविक श्री विठ्ठलाचे ऑन लाईन आणि व्हीआयपी दर्शन घेऊन जातात. या भाविकांकडून शुल्क घेतले जात नाही. झटपट दर्शन घेऊन जाणाऱ्या या मंडळींकडून प्रत्येकी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा ठराव फेबुवारी महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.रणजीतकुमार यांनी करुन तो शासनाच्या न्याय व विधी विभागाकडे पाठवला आहे. त्या विषयी "सकाळ" मध्ये बातमी प्रसिध्द झाल्यानंतर अनेक महाराज मंडळींनी श्री विठ्ठलाची सशुल्क दर्शन व्यवस्था सुरु करण्यास तीव्र विरोध दर्शवला. तर मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी श्री विठ्ठलाची सशुल्क दर्शन व्यवस्था करण्याविषयी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी जरी ठराव केला असला तरी त्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाही असे स्पष्ट केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर श्री. घाडगे यांनी आज "सकाळ" कार्यालयात येऊन श्री विठ्ठलाचे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरु होण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षापासून श्री विठ्ठल मंदिरात पैसे घेऊन लोकांना सोडले जाते. त्याची माहिती सर्वांना आहे. तो प्रकार बंद व्हावा आणि खासगी लोकांच्या खिशात जाणारे पैसे मंदिर समितीला मिळावेत यासाठी सशुल्क दर्शन व्यवस्थेचा पर्याय पुढे आला आहे. सशुल्क व्यवस्थेच्या माध्यमातून समितीकडे मोठ्या प्रमाणावर निधी जमा होईल आणि मगच समिती भाविकांसाठी सुविधा देऊ शकेल. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्थेला विरोध करण्याऐवजी भाविकांच्या राहण्याची व्यवस्था, जास्तीतजास्त लोकांना अन्नछत्रातून अन्नदान, दर्शन रांग व्यवस्थेसाठी सुविधा निर्माण करण्याविषयी मंदिर समितीशी चर्चा करावी. संबंधितांनी जर तशी भूमिका घेतली तर आम्ही त्यांचे स्वागत करु असे श्री. घाडगे यांनी नमूद केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: