पंढरपूर पोलिसांकडून चोवीस तासात मुद्देमालासह आरोपींना अटक

अभय जोशी
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

पंढरपूर ः येथील सराफ व्यावसायिक गोपाळ झव्हेरी यांच्या घरातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोख एक लाख वीस हजार रुपये असा एकूण 7 लाख 46 हजार 500 रुपयांच्या माल असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी (ता.4) पळवून नेली होती. या प्रकरणी चोवीस तासात चार आरोपींना अटक करुन चोरीस गेलेला सर्व माल त्यांच्याकडून जप्त करण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जव्हेरी यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेसह शहरातील तीन तरुणांचा समावेश आहे.

या चोरीची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, येथील पंढरपूर अर्बन बॅंकेच्या महिला शाखेच्या मागील बाजूस सराफ व्यावसायिक गोपाळ जव्हेरी यांचे घर आहे. बुधवारी (ता.4) ते गावाला गेले होते. परंतु त्यांचे अन्य कुटुंबिय घरात होते. सोन्याचे गंठण, राणीहार, मोहनहार, दोन प्रकारची नेकलेस, तोडे जोड, साखळी, अंगठ्या हे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे फुलपात्र, वाटी, करंडा असे सर्व एका बॅग मध्ये ठेवले होते. या दागिन्यांच्या बरोबरच बॅगेमध्ये एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम ही ठेवली होती. स्वयंपाक घरात ठेवलेली ही बॅग दुपारी एक ते चार या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज पाहून वेगाने तपास केला. योगेश राजकुमार आवताडे, (वय 21), प्रकाश माधव दांडेकर (वय 27), गणेश सतीश मंजरतकर (वय 25 तिघेही रा.पंढरपूर) आणि गीता दिपक पवार (वय 30, पदमावती वडार गल्ली, पंढरपूर) यांना अटक करुन त्यांच्याकडे तपास केला. तेंव्हा त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व जव्हेरी यांच्या घरातून चोरलेले सर्व दागिने, चांदीच्या वस्तू व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केला आहे.

सहायक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, पोलिस निरीक्षक श्री.दबडे, पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे फौजदार चंद्रकांत गोसावी, सहायक फौजदार हनुमंत देशमुख तसेच पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :