पंढरपूर जवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

पंढरपूर- पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन पालखीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रकला जेऊर-करमाळा रस्त्यावर आज (शुक्रवार) पहाटे अडीचच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलाचे दर्शन घेऊन पालखीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रकला जेऊर-करमाळा रस्त्यावर अपघात झाला. अपघातात एका वारकऱयाचा मृत्यू झाला तर 48 जण जखमी झाले आहेत. मोतीराम गोविंद शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वारकरी हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व गंगापूर परिसरातील असून, निवृत्ती महाराजांच्या पालखीतील आहेत. ट्रकच्या चालकाला झोप लागल्यामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटून पलटी झाल्याचे समजते.

Web Title: Pandharpur Warkaris truck accident