पंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू

अभय जोशी
शनिवार, 21 एप्रिल 2018

पंढरपूर: ऑस्ट्रेलिया मधील मेलबोर्न मध्ये एम.एस शिक्षणासाठी गेलेल्या पंढरपूर येथील ओमप्रकाश महादेव ठाकरे (वय 24) या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. आज (शनिवार)पहाटे तीनच्या सुमारास ओमप्रकाशचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पंढरपूर मधील लिंक रोड वरील शिवपार्वती नगर मध्ये ठाकरे कुटुंबिय रहातात. ओमप्रकाश हा अतिशय हुशार आणि मनमिळावू विद्यार्थी होता. त्याने कोंढवा (पुणे) येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. पूर्ण केले होते. त्यानंतर पुढील एम.एस. शिक्षणासाठी त्याने ऑस्ट्रेलिया मधील मेलबोर्न येथील स्वीनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला होता. गेल्या एक वर्षापासून तिथे तो शिकत होता. एक महिन्यापूर्वी बहिणीच्या लग्नासाठी तो पंढरपूर येथे आला होता. ओमप्रकाश ठाकरे याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्लीतील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून ओमप्रकाशचा मृतदेह लवकर भारतात आणण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरु केला आहे.

ओमप्रकाश याची आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात तर वडील एल.आय.सी. मध्ये वरिष्ठ विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: Pandharpurs student suspected death in Australia