पाच पोलिस अधिकाऱ्यांसह 23 जणांची खातेनिहाय चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नगर - पांगरमल दारूकांडप्रकरणी पाच अधिकाऱ्यांसह 23 पोलिसांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. श्रीरामपूरच्या अपर अधीक्षकांमार्फत ही चौकशी सुरू आहे. त्यानंतर संबंधितांविरुद्ध कारवाई होईल. पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना या माहितीला दुजोरा दिला. 

"पांगरमल व नेवासे येथील दारूमध्ये "मिथेनॉल' असल्याचा अहवाल रासायनिक तज्ज्ञांकडून आला आहे. विषारी दारू बनविण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवर बडतर्फीची कारवाई होऊ शकेल,' असे त्रिपाठी म्हणाले. दारूबंदीसाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याला गरज भासल्यास पोलिसबळ देऊन संयुक्त कारवाई करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली. 

जिल्ह्यातील पोलिस कोठड्यांमधून आरोपींनी पलायन करण्याचे प्रकार वाढत असून, ही बाब विचारात घेऊन सर्व पोलिस ठाण्यांमधील उपकारागृहे "सीसीटीव्ही'च्या माध्यमातून जोडली असल्याचे त्यांनी सांगितले.