भूकंपाने पश्‍चिम महाराष्ट्र हादरला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पाटण -  भूकंपाच्या धक्‍क्‍याने कोयना धरण परिसरासह कोकण किनारपट्टी, पश्‍चिम महाराष्ट्र हादरला. काल (ता. 3) मध्यरात्री पावणेबारा वाजता कोयना धरणावरील भूकंपमापन केंद्रावर 4.3 रिश्‍टर स्केल भूकंपाची नोंद झाली. भूकंपानंतर कोयना विभागात पाऊस झाला. 

कोयना धरण परिसरासह, कोकण किनारपट्टी व पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन लोकांनी घराच्या बाहेर पडून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा गावापासून ईशान्येला 12 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून भूकंपाची खोली आठ किलोमीटर आहे. कोयना धरणापासून त्याचे अंतर 37.6 किलोमीटरवर आहे. कोकण किनारपट्टीवर त्याची तीव्रता जास्त जाणवली. या धक्‍क्‍याने पाटण तालुक्‍यात कोणतेही नुकसान झाले नाही. कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली. भूकंप झाल्यानंतर कोयना परिसरात पाऊस झाला. भूकंप व पाऊस असा योगायोग झाल्याने पाटणच्या जनतेला 1967 च्या भूकंपाची आठवण आली.