गुप्तधनाच्या लालसेने खड्डा खोदणाऱ्या चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

पाथर्डी - गुप्तधनाच्या लालसेने जांभळी येथे पीरबाबाच्या डोंगरावर खड्डा खोदणाऱ्या सहापैकी चार जणांना पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने पकडले. दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

सर्वांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या दोन जीप पोलिसांनी जप्त केल्या. हा प्रकार रविवारी (ता. 9) रात्री उशिरा उघडकीस आला.

एकनाथ आव्हाड (मूळ रा. जांभळी; हल्ली रा. केडगाव, नगर), सचिन मनोहर पोतदार (रा. भूषणनगर, केडगाव), दादासाहेब मारुती देवकर (रा. चास, ता. नगर) व गणेश शहाजी नवले (रा. पिंपळे गुरव, नवी सांगवी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राजा भोज (रा. पुणे) व गायकवाड (पूर्ण नाव समजले नाही, रा. वैजापूर, जि. औरंगाबाद) पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - जांभळीतील पीरबाबाच्या डोंगरावर गुप्तधन असल्याचे एकनाथ आव्हाड याने काही जणांना सांगितले. ते शोधण्यासाठी तथाकथित यंत्र व मांत्रिकासह काल रात्री दोन जीपमधून हे आरोपी जांभळीच्या डोंगरावर गेले. तेथे पीरबाबाच्या मंदिराशेजारी त्यांनी खड्डा खोदला. यांनी वापरलेल्या बॅटरीच्या उजेडामुळे परिसरातील रहिवाशांना चोर आल्याचा संशय आला. गावकरी डोंगरावर गेले असता सहा जण खड्डा खोदत असलेले दिसले. हा प्रकार रहिवाशांनी मोबाईलद्वारे पोलिसांना कळविला. पोलिस तातडीने घटनास्थळी आले. लोकांनी त्यातील चौघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.