पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर

शीतलकुमार कांबळे
रविवार, 12 मार्च 2017

सोलापूर - संशोधक विद्यार्थ्यांची (पीएच.डी.) माहिती विद्यापीठांनी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील सर्व विद्यापीठांना दिला आहे. "यूजीसी'च्या 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशपातळीवरील संशोधनाचा स्तर कळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सर्व विद्यापीठांनी त्यांच्या संशोधक विद्यार्थी व संशोधनाच्या विषयाची माहिती संकेतस्थळावर दोन महिन्यांच्या आत प्रसिद्ध करावी. या आदेशाची पूर्तता केल्यानंतर दोन महिन्यांत याचा अहवाल "यूजीसी'ला देण्यात यावा, परिपत्रकात नमूद केले आहे. संशोधक विद्यार्थ्याचे नाव, मार्गदर्शकाचे नाव, विषय, विभाग, विद्यार्थ्याचा आधार क्रमांक, नोंदणी क्रमांक, शिष्यवृत्तीचे नाव आदी माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा आदेश न मानता संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध न करणाऱ्या विद्यापीठांची "डिफॉल्टर यादी' तयार करण्यात येणार आहे.

संशोधनाचा दर्जा सुधारावा या उद्देशाने "यूजीसी'ने हा निर्णय घेतला आहे. देशपातळीवर कोणत्या प्रकारचे संशोधन होते, आपल्या देशातील संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठे आहे हे याद्वारे "यूजीसी'ला कळणार आहे. यामुळे संशोधनात होणारी पुनरावृत्ती टाळता येईल.
- प्रा. डॉ. एच. के. अवताडे, अध्यक्ष सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघटना

Web Title: ph.d student information on website