Solapur
Solapur

सोलापुरात येतेय कलबुर्गीहून प्लास्टिक 

सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत गेल्या तीन महिन्यांत 2218 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, कलबुर्गीहून सोलापुरात प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा होत असल्याचे चौकशीदरम्यान आढळले आहे. 

राज्य शासनाने 23 जूनपासून प्लास्टिक वापरावर बंदी घातली. कारवाईचे अधिकार महापालिकेस दिले. अन्न परवाना विभागाकडून तसेच विशेष पथकाकडून शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून प्लास्टिक बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. चार महिन्यांपूर्वी शासनाने 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातल्यानंतर त्यावेळीही महापालिकेच्या अन्न परवाना विभागाकडून शहरात विविध ठिकाणी छापे घालून कारवाई करण्यात आली होती. 

सध्या ही कारवाई फक्त अन्न व परवाना विभागाकडूनच सुरू आहे. महापालिकेच्या आठही विभागीय कार्यालयामार्फत ही कारवाई होणे आवश्‍यक होते. मात्र, अद्यापपर्यंत एकाही विभागीय कार्यालयामार्फत प्लास्टिक जप्तीची कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या तीन महिन्यांत अन्न व परवाना विभागातील महापालिका अन्न व परवाना अधीक्षक ए. के. आराध्ये, निरीक्षक केदार गोटे, श्रीराम कुलकर्णी, महादेव शेरखाने, शंकर आखाडे, राजशेखर वनारोटे, सूर्यकांत लोखंडे, भारत रोडगे व दत्ता गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. मधला मारुती, टिळक चौक, चाटी गल्ली, भांडेगल्ली, बागेवाडी दवाखाना बोळ या परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली. 

आकडे बोलतात... 
कालावधी ः तीन महिने 
तपासलेली दुकाने ः 2923 
दंड झालेले व्यापारी ः 152 
वसूल झालेला दंड ः 7.65 लाख रुपये 
जप्त केलेले प्लास्टिक ः 2218 किलो 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com