आता प्लॉट, फ्लॅट, दुकानगाळेही महागणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

रेडीरेकनरमध्ये दहा टक्‍क्‍यांची वाढ - ग्रामीण भागात दर स्थिर

कोल्हापूर - शासकीय बाजारमूल्यात दहा टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. यासंबंधीचा बाजारमूल्याचा तक्ता आज ऑनलाइन जाहीर झाला. जागेचे दर वाढल्याने बांधकाम व्यावसायिक पुन्हा एकदा अडचणीत येणार आहेत. मध्यमवर्गीय तसेच सामान्यांचे घराचे स्वप्न अधिक महाग झाले आहे. 

शहराचा जुना भाग वगळता अन्य भागांत खुल्या जागा तसेच फ्लॅटचे दर गगनाला भिडणार आहेत.  प्रामुख्याने ई वॉर्डमध्ये जागेचे दर उच्चांकी असतील. ग्रामीण भागाबाबत मवाळ भूमिका घेत शासनाने बाजारमूल्य स्थिर ठेवले आहे. वाढीव दरावर सहा टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का नोंदणी शुल्काची आकारणी होईल. नोटाबंदीनंतर अडचणीत आलेल्या ‘रियल इस्टेट’ला बाजारमूल्याचा फटका बसणार आहे. राज्य शासनाने एक मेपासून बांधकाम व्यवसायासाठी नव्याने नियमावली केली आहे. कायद्याच्या चौकटीत हा व्यवसाय आणण्याचा प्रयत्न आहे. जागामालकांनी पूर्वीच खुल्या भूखंडाची कृत्रिम दरवाढ केली आहे. त्यामुळे नव्याने गृहप्रकल्प उभारणे अशक्‍य होणार आहे. केंद्र सरकारने २०२२ पर्यंत स्वप्नातील घरांचे स्वप्न दाखवले तर दरवर्षी बाजारमूल्यातील वाढ पाहता अशी घरे देणे शक्‍य होईल, असाही प्रश्‍न आहे. शहराचा विचार करता पेठांचा जुना भाग वगळता अन्य भागांत व्यापारी संकुले उभी राहिली आहेत. दहा ते पंधरा टक्‍क्‍यांच्या वाढीमुळे जागांना सोन्यापेक्षाही अधिक भाव येणार आहे. महाद्वार रोड, गुजरी, खरी कॉर्नर, जोतिबा रोड, पापाची तिकटी, शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, शाहूपूरी, न्यू शाहूपूरी, उद्यमनगर, राजारामपुरी, बागल चौक परिसर, स्टेशन रोड, शिवाजी पार्क, ताराराणी चौक परिसर, ताराबाई पार्क, नागाळा पार्क या परिसरात जागेच्या दरात मोठी वाढ होणार आहे.

Web Title: plot, flat shops rates increase