काकडीच्या ग्रामस्थांना होत्या घराबाहेर न पडण्याच्या नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पोहेगाव - साईभक्तांच्या सोयीसाठी काकडी येथे झालेल्या विमानतळाचे उद्‌घाटन रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले; मात्र या कार्यक्रमास प्रशासनाने काकडीतील कोणालाही उपस्थित राहू दिले नाही, अगदी सरपंचालाही नाही.

उद्‌घाटन काळात घराबाहेर न पडण्याच्या नोटिसाच विमानतळ परिसरातील रहिवाशांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आपल्याच जमिनीवर झालेल्या विमानतळाचा उद्‌घाटन सोहळा पाहता न आल्याचे दुःख आणि संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. विमानतळावर आज चार विमाने उतरली.

उद्‌घाटन काळात काकडी गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विमानतळावरील कार्यक्रम 29 मिनिटे चालला. 10 वाजून 25 मिनिटांनी राष्ट्रपतींच्या गाड्यांचा ताफा शिर्डीकडे रवाना झाला. त्या वेळी रहिवाशांनी रस्त्याच्या कडेला गर्दी केली; मात्र कडेकोट बंदोबस्तामुळे त्यांना हा ताफाही बऱ्याच अंतरावरून पाहावा लागला. रस्त्याच्या व विमानतळाच्या जवळ राहणाऱ्यांना प्रशासनाने घराबाहेर न पडण्याच्या नोटिसाच दिल्या होत्या. काकडीचे सरपंच व ग्रामसेवक यांना विमानतळ प्राधिकरणाने निमंत्रणपत्रिका दिली होती; मात्र उपस्थितीचे पास दिले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.