पोलिसांचे आहे लक्ष.. तुम्हीही रहा दक्ष.. !

terrorist
terrorist

सोलापूर - दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या "सिमी' संघटनेचे सोलापुरात सुरवातीपासूनच जाळे होते. दोन दिवसांपूर्वी भोपाळमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये "सिमी'चा कार्यकर्ता असलेला सोलापूरचा खालिद मुच्छाले मारला गेला. देशविघातक कृत्य करणाऱ्या संघटनांच्या जाळ्यात तरुण ओढले जाऊ नयेत यासाठी एटीएसकडून (दहशतवादविरोधी पथक) प्रयत्न होत आहेत. संशयास्पद प्रत्येक हालचालीवर "एटीएस'चे लक्ष असले तरी देशाच्या सुरक्षेसाठी नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे. 

शिक्षणाचा अभाव असल्याने अनेक तरुण सिमीसारख्या संघटनांच्या संपर्कात येऊन देशविघातक कृत्य करीत आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मराठवाड्याला लागून असलेल्या सोलापुरात मध्यंतरीच्या काळात सिमीच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. डिसेंबर 2013 मध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने महंमद खालिद सलीम मुच्छाले (वय 30, रा. विजयनगर, नई जिंदगी, सोलापूर) यास ताब्यात घेतले होते. भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षारक्षकाची हत्या करून 31 ऑक्‍टोबरच्या पहाटे पलायन करणारे सिमीचे आठ जण पोलिसांकडून मारले गेले. त्यात सोलापूरच्या खालिद मुच्छालेचा समावेश आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दहशतवादी कारवायांशी संबंधित कोणतीही चळवळ सुरू नाही. पोलिस आपले कर्तव्य चोख बजावत असले तरी नागरिकांनीही स्वत:च्या आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षेसाठी दक्ष राहणे गरजेचे आहे. 

ही घ्या दक्षता.. 
- घर भाड्याने देताना भाडेकरूची कागदपत्रे आणि छायाचित्रे घ्या. 
- भाडेकरूंची माहिती स्वत:कडे ठेवा आणि पोलिसांनाही कळवा. 
- अनोळखी व्यक्तीबाबत संशय आल्यास तत्काळ पोलिसांना सांगा. 
- पोलिसांना माहिती देण्यासाठी 100 यासह शहर- 02172 744600, ग्रामीण- 0217 2732000 हे क्रमांक आपल्याकडे नोंद करून ठेवा. जवळच्या पोलिस ठाण्याशीही संपर्क साधता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com