जुगार अड्ड्यावर छापा टाकून 3 लाखांपर्यंतचा मुद्देमाल जप्त

सचिन शिंदे
बुधवार, 4 एप्रिल 2018

पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने आज सायंकाळी कारवाई केली. त्यात चौघांना अटक झाली आहे. चौघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. प्रवीण काटरे (रा. बुधवार पेठ), सुरेश जुंबरे (शनिवार पेठ), किशोर जांभळे (सुपने) व बाबालाल मुल्ला (साईनगर, बैलबजार रस्ता, शनिवरा पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कऱ्हाड : गोळेश्वर येथील वाखान नावाच्या शिवारात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे दोन लाख ८९ हजार ३९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने आज सायंकाळी कारवाई केली. त्यात चौघांना अटक झाली आहे. चौघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. प्रवीण काटरे (रा. बुधवार पेठ), सुरेश जुंबरे (शनिवार पेठ), किशोर जांभळे (सुपने) व बाबालाल मुल्ला (साईनगर, बैलबजार रस्ता, शनिवरा पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांचा छापा टाकल्याचे समजताच डावात बसलेले चौघेजण तेथून पळून गेल्याने त्यांना अटक करता आली नाही.

पोलिसांनी सांगितले की, गोळेश्वर येथील वाखान नावाच्या शिवारात तीन पानी जुगाराचा अड्डा असल्याची माहिती उपाधीक्षक ढवळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वाखान नावाच्या शिवारात बर्गे मळा येथे छापा टाकला. त्यावेळी रणजीत माने यांच्या शेडमध्ये जुगाराचा अड्डा सुरू अशल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तेथे छापा टाकला. त्यावेळी काटरे अड्डा चालवत आहे, अशी माहिती त्यांना समजले. पोलिसांनी सायंकाळी सहाच्य़ा सुमारास तेथे छापा टाकला. त्यावेळी डावातून रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य व त्यांच्याकडील वाहने असा सुमारे दोन लाख ८९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त झाला. महेश येळवे, संजय ढेब, महादेव यादव व सोन्या पाटोले अशी पळून जाणाऱ्यांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले. कारवाईत श्री. ढवळे यांच्यासह सहायक पोलिस निरिक्षक हनुमंत गायकवाड, फौजदार एस. डी. शेलार, प्रकाश राठोड, सहायक फौजदार राऊत,  हवालदार भास्कर जगदाळे, सतीश जाधव, अरूण दुबळे, कैलास रसाळ, प्रवीण पवार, शरद गुरव, दीपक कोळी व रविंद्र चव्हाण यांनी सहभाग घेतला.

Web Title: police arrested gambler in Karhad

टॅग्स