झाडे तोडल्याप्रकरणी प्राचार्यावर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सोलापूर - एस. ई. एस. पॉलिटेक्‍निक कॉलेजच्या आवारात महापालिकेच्या परवानगी शिवाय झाडांच्या फांद्या तोडल्या प्रकरणी प्राचार्य राजमाने यांच्यावर जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

महापालिकेचे सहायक वृक्ष अधिकारी अजयकुमार गणपत चव्हाण यांनी ही फिर्याद दिली. एस. ई. एस. पॉलिटेक्‍निक कॉलेजमध्ये झाडे तोडल्याबाबत संकेत किल्लेदार यांनी महापालिका उद्यान विभागाकडे अर्ज दिला होता. उद्यान विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर ही तक्रार नोंदविण्यात आली. 

कॉलेजच्या आवारात पाच लिंब, दोन गुलमोहर, एक रेन ट्री, एक पिंपळ अशा एकूण नऊ झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याचे दिसून आले. झाडे तोडण्यापूर्वी महापालिकेची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक होते, प्राचार्य राजमाने यांनी परवानगी घेतली नाही. त्यामुळे उद्यान विभागाने पंचनामा करून जोडभावी पेठ पोलिसात प्राचार्य राजमाने यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 

दरम्यान, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना झाडांमुळे अडथळा निर्माण झाल्याने झाडे तोडल्याचे प्राचार्य राजमाने यांनी म्हटले आहे. 

Web Title: Police case against professor for cutting down trees