महिला पोलिस नाईक लाच घेताना ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

इचलकरंजी - कारवाई टाळण्यासाठी हजाराची लाच घेताना इचलकरंजी (गावभाग) पोलिस ठाण्यातील महिला पोलिस नाईक श्रीमती वैशाली अण्णासाहेब कांबळे (बक्कल नं. २१४५, मूळ रा. अब्दुललाट, ता. शिरोळ, सध्या रा. जुनी पोलिस लाईन, इचलकरंजी) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. 

इचलकरंजी - कारवाई टाळण्यासाठी हजाराची लाच घेताना इचलकरंजी (गावभाग) पोलिस ठाण्यातील महिला पोलिस नाईक श्रीमती वैशाली अण्णासाहेब कांबळे (बक्कल नं. २१४५, मूळ रा. अब्दुललाट, ता. शिरोळ, सध्या रा. जुनी पोलिस लाईन, इचलकरंजी) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. 

पोलिस ठाण्याच्या मुख्य फाटकातच आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. येथील लाखेनगर, जाधव मळ्यामधील श्रीमती रेखा अनिल देसाई यांच्या मुलाविरोधी वैशाली कांबळे ठाणे अंमलदार असताना तक्रार अर्ज आला होता. त्या तक्रारीमध्ये कारवाई न करण्याबाबत कांबळेने श्रीमती देसाई यांच्याकडे तीन हजारांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर एक हजार रुपये पोलिस ठाण्याच्या मुख्य दरवाजावर पैसे स्वीकारताना अटक केली. 

कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपाधीक्षक आफळे, पोलिस निरीक्षक सुनील वायदंडे, सहायक फौजदार मनोहर खणगावकर, कॉन्स्टेबल अमर भोसले, मनोज खोत, महिला कॉन्स्टेबल अर्पिता चौधरी यांनी ही कारवाई केली.

वैशाली कांबळेवर या अगोदर कौटुंबिक कारणावरून पतीसोबत वाद घालून गोंधळ घातल्याबाबत इस्लामपूर (जि. सांगली) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. तसेच तिने कागल तालुक्‍यातील एका मित्राला जिल्हा पोलिस अधीक्षकांचा रीडर बोलतो, असे सांगून पोलिस ठाण्याच्या हजेरी मास्तर पोलिसाला रात्रीची ड्युटी लावली. कारवाई करण्याबाबत मोबाइलवरून धमकी दिल्याबद्दल तिच्यासह मित्रावर इचलकरंजी (गावभाग) पोलिसांत तक्रार नोंद आहे. याची माहिती घेऊन त्यांना गावभाग पोलिस ठाण्यात बदलले होते.

इचलकरंजी (गावभाग) पोलिस ठाणेही डागाळले
इचलकरंजी ग्रामीण पोलिस उपाधीक्षक कार्यक्षेत्रातील हुपरी, शिवाजीनगर, शहापूर, शहर वाहतूक शाखा या पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांसह कॉन्स्टेबलना अलीकडे लाच घेताना पकडले आहे. त्यापाठोपाठ आज इचलकरंजी (गावभाग) पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस नाईकला लाचप्रकरणी अटक केल्याने हे पोलिस ठाणे डागाळले.

१५ लाचखोरांना अटक
इचलकरंजी ग्रामीण पोलिस उपाधीक्षक कार्यालय कार्यक्षेत्रात कुरुंदवाडसह हुपरी, शिवाजीनगर, शहापूर, शहर वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखा अशा सहा पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत इचलकरंजी पोलिस उपाधीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस निरीक्षकांसह सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस नाईक, हवालदार, कॉन्स्टेबल अशा सुमारे पंधरा जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

पश्चिम महाराष्ट्र

हुपरी (कोल्हापूर) : वंदे मातरम् म्हणण्यास नकार दर्शविल्याच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाचे नेते खासदार अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक...

06.24 PM

साताराः रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॅाडी सदस्यपदी मुस्लीम बॅकवर्ड क्लासेस ऑग्रनायझेस, इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शौकत...

05.06 PM

कर्‍हाड:  कोयना धरणाच्या पाणलोट पडणाऱ्या पावसामुळे जलाशयातील पाणीसाठा नियंत्रीत ठेवणेसाठी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातुन...

10.00 AM