कोरेगावात जुगार अड्ड्यांवर छापा 

कोरेगावात जुगार अड्ड्यांवर छापा 

कोरेगाव - शहर व परिसरातील विविध ठिकाणच्या जुगार, मटका व दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापा घालून रोख रकमेसह सुमारे एक लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, या विविध प्रकरणी एकूण 29 जणांवर कारवाई केली आहे. काल सायंकाळी पोलिसांनी सुरू केलेले हे छापासत्र आज दिवसभरही राबवले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा येथील परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या पथकाने काल सायंकाळी सहाच्या सुमारास शहरातील दरबार कलेक्‍शनच्या पाठीमागील एका जुगार अड्ड्यावर छापा घालून मोठी कारवाई केली. याठिकाणी पत्त्यांवर जुगार खेळताना आढळून आलेले व्यावसायिक संजय झंवर, ऍड. जयवंत केंजळे, प्रभाकर बर्गे, राजेंद्र शहा, हणमंत बर्गे, दत्तात्रय पिसाळ, विश्‍वनाथ शिर्के, सुरेश फडतरे, किसन माने यांच्याकडून रोख 89 हजार 490 आणि साहित्य असा एकूण एक लाख नऊ हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आज पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सुलतानवाडी येथील जुगार अड्ड्यावर छापा घातला. याठिकाणी पत्त्यांवर जुगार खेळताना आढळून आलेले आनंदा जाधव, मोहन फडतरे, विजय फडतरे, सुधाकर फडतरे, प्रल्हाद कळसे, अशोक फडतरे, सागर फडतरे, बाळकृष्ण भोसले, ललित घायताडे, अमर जाधव, मानसिंग गोंजारी, सखाराम जगताप यांच्याकडून रोख रकमेसह 11 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लक्ष्मीनगर येथील एका कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा घालून बबन चव्हाण, लतीफ शेख, ज्ञानदेव सपकाळ, विजयपाल वाल्मिकी, नामदेव जाधव यांच्याकडून एक हजार 750 रुपयांचा आणि भाजी मंडईतील एका मटका अड्ड्यावर छापा घालून संतोष लोंढे याच्याकडून दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय नांदगिरीनजीकच्या कल्याणगड ढाब्यानजीक छापा घालून दोन हजार 70 रुपयांची विदेशी दारू जप्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com