पोलिस उपनिरीक्षकच लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 31 मे 2018

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील चार गुंठ्याच्या जागा खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याबद्दल तक्रारदारांनी दिलेल्या अर्जात तुम्हाला मदत करतो म्हणुन एक लाख रूपये लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक विष्णु साहेबराव गायकवाड याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केल्याची घटना मोहोळ येथे काल (ता. 30) घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ येथील तक्रारदाराच्या आत्याने मोहोळ मध्ये 4 गुंठे बांधकाम असलेली जागा खरेदी केली होती. खरेदी खताची पूर्ण रक्कम खरेदी खतावेळी दिली होती. असे असताना खरेदी करणाऱ्यांनी आम्हास कमी रक्कम देऊन खरेदी करुन घेऊन  आमची फसवणूक केल्याची तक्रार तक्रारदार यांच्या आत्याच्या व त्यांच्या कुंटुंबियांच्या नावे मोहोळ पोलीसात दिली होती. त्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी तक्रारदाराच्या नातेवाईकांना मुंबईहुन चौकशीसाठी बोलावून घेऊन तक्रारी अर्ज निकाली काढण्यासाठी तक्रार दार यांच्याकडे सहा लाख रुपये लाचेची मागणी विष्णु गायकवाड करीत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधककडे दिली होती. त्यानुसार तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तक्रार दार व पंच साक्षीदार यांनी मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये येऊन विष्णु गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता प्राप्त झालेल्या अर्जामध्ये कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुरुवारी (ता .30) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने विष्णु गायकवाड यास ताब्यात घेऊन सोलापूर विभागाचे पोलीस निरीक्षक वैभव मारकड यांनी  गुन्हा नोंद केला आहे .

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, लाच लुचपत प्रतिबंधक खाते पुणे येथील अप्पर अधिक्षक बोरस्ते, सोलापूर विभागाचे अधिक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: police sub inspector arrested for taking bribe of rupees 1 lakh