डॉ. किरवले यांच्या खुनातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

कोल्हापूर - ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या खुनाचा सर्व बाजूंनी तपास करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करा, या मागणीचे निवेदन डावे पुरोगामी पक्ष व संघटनेतर्फे पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांना देण्यात आले. 

एसएससी बोर्डाजवळील निवासस्थानी डॉ. किरवले यांचा 3 मार्चला खून झाला. या खुनातील संशयित व त्याच्या आईला पोलिसांनी अटक केली. तपासात खुनामागे वैयक्तिक कारण असल्याचे पुढे आले; मात्र ते विचारवंत होते. त्यांचे राज्याच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान होते. गेल्या काही वर्षांत पुरोगामी विचाराच्या नामवंत व्यक्तींचे खुनाचे सत्र सुरू झाले आहे. अशा वातावरणात डॉ. किरवले यांची हत्या केवळ वैयक्तिक कारणाने झाली आहे, असा घाईने निष्कर्ष काढू नये. त्यामागील सर्व शक्‍यता तपासा, नाही तर खरे गुन्हेगार मोकळे राहतील. या प्रकरणाचा निःपक्ष व सर्व बाजूंनी तपास करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली. शिष्टमंडळात दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, लक्ष्मण वायंदडे, उदय नारकर, व्यंकाप्पा भोसले, सुवर्णा तळेकर, बी. एल. बर्गे, चंद्रकांत यादव, मुसा देसाई आदींचा समावेश होता.