पोलिसाच्या मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सोलापूर : घरगुती वाद मिटत नसल्याने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय ऊर्फ राजू चंद्रकांत जंगम, ओंकार अभिमान शिंदे (रा. दमाणीनगर, पावन गणपतीजवळ, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिस हवालदार ओमप्रकाश माणिक मडवळी यांनी फिर्याद दिली आहे. धनंजय हा पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत जंगम यांचा मुलगा आहे. घरगुती वाद मिटत नसल्याने धनंजय याने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. माझे आई, वडील व भाऊ माझ्याशी भांडण करतात. त्यांचा बंदोबस्त करा नाहीतर आम्ही येथेच विष पिऊन मरतो. खिशातून एक बाटली काढून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Web Title: Policeman son attempt suicide