करकंब - मशिन बंद पडल्याने पांढरेवाडी येथील मतदान ठप्प

करकंब - मशिन बंद पडल्याने पांढरेवाडी येथील मतदान ठप्प

करकंब - पांढरेवडी (ता.पंढरपूर) येथे आज ग्रामपंचायतीसाठी मतदान चालू असताना केवळ दहाच मिनिटात चारही बुथवरील मशिन बंद पडले. त्यामुळे सुमारे दीड तास संपूर्ण मतदान प्रक्रियाच ठप्प झाली होती.

पांढरेवाडी येथे आज सकाळी नियमानुसार साडेसात वाजता ग्रामंपायतीचतासाठी मतदान चालू झाले. मतदानासाठी येथे चार बुधची व्यवस्था केली होती. मात्र या चारही बूथवर प्रत्येकी पाच मतदारांनी मतदान केल्यानंतर अचानक मशिन बंद पडल्या. एखाद्या मशिनवरील तांत्रिक बिघाड समजू शकतो पण एकाच वेळी चारही मशिन बंद पडल्यामुळे उलट-सुलट चर्चेला उत आला होता. सकाळी मतदान करुन दिवसभराच्या कामासाठी मार्गस्थ होण्याच्या दृष्टीने आलेल्या मतदारांना निराश होवून माघारी परतावे लागले. येथिल कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांनतर तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी तातडीने दुसऱ्या पर्यायी मशिनची व्यवस्था करुन मतदान प्रक्रिया सुरळीत चालू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर पावणेआठ वाजता बंद पडलेली मतदान प्रकिया तब्बल दीड तासानंतर सवानऊ वाजणेचे सुमारास चालू झाली. 

नंदू फाळके (ग्रामस्थ, पांढरेवाडी)- आज सकाळी पांढरेवाडी येथे साडेसात वाजता मतदान प्रकिया चालू झाल्यानंतर अवघ्या दहाच मनिटात चारही बूथवरील मशिन बंद पडल्या. एखाद्या मशिनवरील घोटाळा आम्ही समजू शकतो. पण एकाच वेळी चारही मशिन बंद पडणे अत्यंत गंभीर बाब आहे. मतदान करण्यासाठी आलेले अनेक मतदार माघारी गेले. त्याचा फटका मतदानाच्या एकूण टक्केवारीवर होणार आहेच. पण एखाद्या उमेदवाराच्या विजयावरही याचा परिणाम होवू शकतो.

मधुसुदन बर्गे (तहसीलदार, पंढरपूर)- पांढरेवाडी येथिल मतदान प्रक्रिया चालू झाल्यानंतर मशिनमधून एरर येवू लागल्याने मतदान प्रकिया ठप्प झाली होती. त्यानंतर तातडीने पर्यायी मशिन उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. वाया गेलेला वेळ मतदानासाठी वाढवून देता येत नाही. मात्र नियोजीत वेळेत म्हणजे साडेपाच वाजपर्यंत जेवढे मतदार हजर असतील त्या सर्वांचे मतदान करुन घेतले जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com