तात्यासाहेब कोरेंच्या नावाने टपाल तिकिट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

वारणानगर ः वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांची सहकारातील कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या टपाल खात्याने "विशेष टपाल' तिकिटाची निर्मिती केली आहे. या तिकिटाचे अनावरण मंगळवारी (ता. 13) कुस्ती मैदानात होणार आहे.

असा सन्मान होणारे सहकार क्षेत्रातील तात्यासाहेब कोरे हे पहिले व्यक्तिमत्त्व ठरले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सहकाराचा सन्मान होणार असल्याची माहिती माजी मंत्री विनय कोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

तात्यासाहेब कोरे यांनी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाची स्थापना केली. त्यांनी वारणाकाठी हरित-धवल क्रांती करून नंदनवन उभारले. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी सर्वागीण विकास साधला.
तात्यासाहेबांचे कार्य नव्या पिढीला आदर्श ठरावे, प्रेरणा मिळावी यासाठी भारत सरकारच्या टपाल खात्याच्या महाराष्ट्र परिमंडलांतर्गत कोल्हापूर विभागामार्फत हे विशेष टपाल तिकिट 22व्या पुण्यतिथीदिनी (मंगळावारी) काढले जाणार आहे.