पोस्टल कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

सांगली - 16 विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन व नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज यांनी भाग घेतला आहे. 

जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील 228 कर्मचारी सहभागी झाले. पोस्टातील दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

कर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा ः पोस्टमन, एमटीएसच्या रिक्त जागा भरणे, पोस्टमन, एम. टी. एस. च्या कर्मचाऱ्यांना बदली प्रक्रियतून वगळावे, अनुकंपा तत्त्वावरील सर्वरिक्त जागा त्वरित भरा, पोस्टमन व एम.टी.एस.श्रेणीतील खेळाडुंचा राखीव कोटा त्वरित भरा. 

जिल्ह्यातील 982 कर्मचाऱ्यांपैकी 228 जणांनी आंदोलनात भाग घेतला. ग्रामीण डाक सेवकांपैकी 611 पैकी 54 लोक संपात सहभागी होते. मागण्या मान्य न झाल्यास पाच एप्रिलपासून महाराष्ट्रातील पोस्टमन व एम.टी.एस कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. 

Web Title: Postal workers strike