सहकारमंत्री देशमुखांची 'विकेट' घेणार - प्रणिती शिंदे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

सोलापूर - 'मोटारीतून बेहिशेबी रक्कम नेण्याच्या प्रकरणात चर्चेत आलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची नागपूर अधिवेशनात सहकारी पक्षाच्या मदतीने निश्‍चित विकेट घेऊ,'' असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महापालिकेत आयोजित कार्यक्रमासाठी प्रणिती शिंदे सोलापुरात आल्या होत्या. नोटाबंदी व सहकारमंत्र्यांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, 'मोटारीतून नेली जाणारे 91 लाख रुपये ते मोदींना देणार होते की फडणवीसांना हे माहिती नाही. मात्र या प्रकरणामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे. नागपूर अधिवेशात आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू; तसेच बेहिशेबी रक्कमप्रकरणी कुणीही दोषी असेल अशा सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करणार आहोत. त्यासाठी आमचे सहकारी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर पक्षही निश्‍चित आमच्या सोबत असतील.''

'नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. सरकारचे काहीच नियोजन नाही. नोटा बदलण्यासाठी वयस्कर आईला उन्हात पाठविणारे पंतप्रधान असंस्कृत आहेत,'' असा टोलाही आमदार प्रणिती यांनी लगावला.