प्रशांतचे तोंडून चुकीचे शब्द गेले : सुधाकर परिचारक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

पंढरपूर: मध्यंतरी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारामध्ये प्रशांतच्या तोंडातून काही चुकीचे शब्द गेले. त्याच्याकडून असे व्हायला नको होते. परंतु त्याने जाहीर माफी मागितली आहे. तरीही विरोधकांकडून राजकारण सुरू आहे, अशी खंत आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते व ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांची व्यक्त केली. तसेच कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जशी साथ दिली तशीत साथ आताही द्यावी, असे आवाहन केले.

पंढरपूर बाजार समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी सध्या परिचारक परिवाराला वाईट काळ आला असल्याचे सांगताना त्यांना अक्षरशः गहिवरून आले.

ते म्हणाले, 'यापूर्वी परिचारक परिवारावर अनेक राजकीय संकटे आली. त्या-त्या वेळी कार्यकर्ता न डगमगता खंबीरपणे परिवाराच्या मागे उभे राहिला. मध्यंतरी निवडणूक प्रचारामध्ये प्रशांतच्या तोंडातून काही चुकीचे शब्द गेले. त्याच्याकडून असे व्हायला नको होते. परंतु त्याने जाहीर माफी मागितली आहे. तरीही विरोधकांकडून राजकारण सुरू आहे. माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे. सर्वांनी शांतता राखावी. मागे जशी तुम्ही साथ दिली, तशीच साथ यापुढे देखील द्यावी. प्रशांत परिचारकांनी सैनिकांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुधाकर परिचारक यांनी आज (शुक्रवार) प्रथमच आपली भावना कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केली.'

Web Title: prashant paricharak the wrong word: Sudhakar paricharak