प्रशासनाचीही जय्यत तयारी सुरू 

प्रशासनाचीही जय्यत तयारी सुरू 

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाचीही जय्यत तयारी सुरू आहे. मतदान यंत्रांची दुरुस्ती, त्याचे तालुकानिहाय वाटप, कर्मचारी नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण, यंत्रात मतपत्रिका बसवणे, मतदानासाठी लागणाऱ्या साहित्यांची जुळवाजुळव या कामात महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त आहेत. 

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या 67 जागांसाठी 322 तर 12 पंचायत समितीतील 134 जागांसाठी 583 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 21 लाख 38 हजार 80 मतदार असून 12 तालुक्‍यातील 2 हजार 451 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. 118 केंद्रे संवेदनशील आहेत. 

या निवडणुकीचे मतदान यंत्रावर होणार आहे. त्यासाठी गेले महिनाभर या यंत्राच्या देखभाल दुरुस्तीचे काम रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सुरू होते. ही यंत्रेही मतदानासाठी सज्ज झाली आहेत. आजपासून तालुक्‍यासाठी आवश्‍यक यंत्रे पाठवण्याचे काम सुरू होते. तालुक्‍याच्या ठिकाणी या यंत्रावर मतपत्रिका लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

मतदान व मतमोजणीसाठी सुमारे 16 हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रशिक्षणही काल पूर्ण झाले. या कर्मचाऱ्यांना तालुकानिहाय हे प्रशिक्षण देण्यात आले. सोमवारी दिवसभर या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी बसबरोबरच काही खासगी वाहनेही भाड्याने घेण्यात आली आहेत. मतदान संपल्यानंतर सर्व यंत्रे त्या त्या तालुक्‍यातील मतमोजणीच्या ठिकाणी एकत्रित करण्यात येतील. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त रहाणार आहे. निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त तर संवेदनशील ठिकाणी सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान कर्मचाऱ्यांबरोबरच हा बंदोबस्त तालुक्‍याच्या ठिकाणी पाठवण्यात येईल. 

दृष्टिक्षेपात निवडणूक 
जि. प. एकूण जागा - 67 
पं. स. एकूण जागा - 134 
मतदारांची संख्या - 21 लाख 38 हजार 80 
मतदान केंद्रांची संख्या - 2451 
मतदान कर्मचाऱ्यांची संख्या - 16 हजार 176 
मतदानासाठी सज्ज यंत्रांची संख्या - 6 हजार 181 (प्रत्येक केंद्रावर दोन) 
याशिवाय - 40 भरारी पथके, 39 स्थिर नियंत्रण कक्ष, 56 व्हिडिओ निरीक्षण पथके, 12 जाहिरात प्रसारण समित्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com