पोलिसांच्या खासगी वाहनांनाही प्रवेश बंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

कोल्हापूर - भवानी मंडपात फक्त पोलिसांच्या खासगी वाहनांना दिला जाणाऱ्या प्रवेशबद्दल उमटलेल्या नाराजीची दखल अखेर प्रशासनाने घेतली. काल सायंकाळपासून पोलिसांची सर्व खासगी वाहने येथून हलवण्यात आली. त्यामुळे नागरिकांना पहिल्यांदाच वाहनमुक्त भवानी मंडपाचे चित्र अनुभवयास मिळाले. 

कोल्हापूर - भवानी मंडपात फक्त पोलिसांच्या खासगी वाहनांना दिला जाणाऱ्या प्रवेशबद्दल उमटलेल्या नाराजीची दखल अखेर प्रशासनाने घेतली. काल सायंकाळपासून पोलिसांची सर्व खासगी वाहने येथून हलवण्यात आली. त्यामुळे नागरिकांना पहिल्यांदाच वाहनमुक्त भवानी मंडपाचे चित्र अनुभवयास मिळाले. 

गेल्या आठवड्यात रात्री भवानी मंडपात ट्रक घुसला होता. ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण व्हावे आणि अपघात टाळले जावेत,या उद्देशाने तातडीने प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या. भवानी मंडप सर्व वाहनांनासाठी बंद करण्यात आला. भवानी मंडपात येणारे तिन्ही मार्ग बॅरेकेडस्‌ लावून बंद करण्यात आले. पर्यायी पार्किंगची व्यवस्था नसल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचे हाल सुरू झाले. मात्र याबाबत अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाही. मात्र भवानी मंडपात पोलिसांच्या वाहनांना मुक्त प्रवेश दिला जात होता.पोलिस ठाण्याची दोन सरकारी व्हॅनसह अधिकृत मोटारसायकलींना मंडपात दिला जाणाऱ्या प्रवेशाबाबत कोणाचीही हरकत नव्हती. मात्र पोलिसांच्या खासगी वाहनांना थेट प्रवेश दिला जाऊ लागला. याची चिड मात्र नागरिकांत होती. त्याबाबतच्या प्रतिक्रीयाही सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागल्या. याबाबत "सकाळ'मध्ये "पोलिसांच्या वाहनांना प्रवेश कसा?' या शिर्षकाखाली पोलिसांच्या खासगी वाहनांना फक्त कशा पद्धतीने मंडपात प्रवेश दिला जातो,याबद्दल वृत्त प्रसिध्द झाले. 

काल विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनीही पोलिसांच्या वाहनांना कसा प्रवेश दिला जातो हा मुद्दा पोलिस प्रशासनाकडे उपस्थित केला होता. त्यानुसार सायंकाळ पासून भावनी मंडपातील पोलिसांची खासगी वाहने तातडीने हलविण्यात आली. वाहनमुक्त भावनी मंडपामुळे पर्यटकासह स्थानिकांतील नाराजी दूर झाल्याचे जाणवत होते.