तुम्ही शीघ्रकोपी आहात का?

परशुराम कोकणे
सोमवार, 28 मे 2018

प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून समोरच्या व्यक्तीला प्रतिसाद द्यायला हवा. राग व्यक्त करताना रक्तदाब वाढतो. माझचं खरं ही मानसिकता अनेकदा राग व्यक्त करायला कारणीभूत ठरते. छोट्या छोट्या कारणांवरून वाद घालून राग व्यक्त करू नये. सहनशीलता वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आपल्यासोबत सातत्याने वादीवादी, चिडचिडपणा, राग येण्याचे प्रकार घडतील असतील तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. 
- नितीन भोगे, मानसोपचार तज्ज्ञ

सोलापूर : छोट्या छोट्या कारणांवरून राग येण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे. तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. कुटुंबीय आणि मित्रांशी सुसंवादाचा अभाव, मी म्हणतोय तेच खरं ही मानसिकता, सातत्याने नकारात्मक विचार यामुळे शीघ्रकोपीपणा वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

गेल्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसाला दुचाकीस्वाराने मारहाण केली. चुकीच्या दिशेने जाण्यास पोलिसाने प्रतिबंध केल्याने हा वाद झाला. दुचाकीस्वारास आणि पोलिस कर्मचाऱ्याला राग अनावर होऊन वाद वाढत गेला आणि झटापटही झाली. या घटनेच्या निमित्ताने "सकाळ'ने मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधला. याबाबत बोलताना डॉ. नितीन भोगे म्हणाले, ठरवून राग व्यक्त करणे आणि अचानक राग येणे असे दोन प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीवर आपण राग व्यक्त करत असतानाही आपल्या शरीरात बदल होतात. नियंत्रण सुटले तर अचानक हृदय विकाराचा झटका येणे, लकवा मारणे असे प्रकार घडू शकतात. राग आला तरी शांत राहून स्वत:वर नियंत्रण ठेवणे हाच उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. 

ही आहेत कारणे 
- नकारात्मक विचारात वाढ 
- कुटुंबीय आणि मित्रांशी संवाद कमी 
- स्वत:वरचं नियंत्रण सुटणे
- परिणाम माहिती असूनही राग व्यक्त करणे 

हे आहेत उपाय 
- काही ठिकाणी माघार घेण्याची तयार ठेवावी 
- नेहमी सकारात्मक विचार करावे 
- सहनशीलता वाढविली पाहिजे 
- तणावमुक्तीसाठी मित्र, कुटुंबीयांशी सुसंवाद वाढावा 

प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून समोरच्या व्यक्तीला प्रतिसाद द्यायला हवा. राग व्यक्त करताना रक्तदाब वाढतो. माझचं खरं ही मानसिकता अनेकदा राग व्यक्त करायला कारणीभूत ठरते. छोट्या छोट्या कारणांवरून वाद घालून राग व्यक्त करू नये. सहनशीलता वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आपल्यासोबत सातत्याने वादीवादी, चिडचिडपणा, राग येण्याचे प्रकार घडतील असतील तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. 
- नितीन भोगे, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: psychological problem in youth