पुणतांब्यात शेतकऱ्यांनी घातला सरकारचा "दहावा'!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

पुणतांबे - संपकरी शेतकऱ्यांनी आज टपाल कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालयास कुलपे ठोकली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरकारचा निषेध करीत त्यांनी दशक्रिया व तेरावा विधी केला.

पुणतांबे - संपकरी शेतकऱ्यांनी आज टपाल कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालयास कुलपे ठोकली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरकारचा निषेध करीत त्यांनी दशक्रिया व तेरावा विधी केला.

शेतकऱ्यांचा संपाचा आज सहावा दिवस होता. दूधसंकलन बंद असल्यामुळे दूध संघाची वाहनेही आज गावात आली नाहीत. शेतकऱ्यांनी गावातच दुधाचे वाटप केले. गावात भाजीपालाही फारसा उपलब्ध नव्हता.

ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सकाळी शेतकरी एकत्र जमले. संपूर्ण कर्जमाफीच्या घोषणा देत सरकारचा निषेध म्हणून दशक्रियाविधी केला. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत, तलाठी, टपाल कार्यालयाकडे मोर्चा वळविला. कर्मचाऱ्यांना बाहेर बोलवून कार्यालयास टाळे ठोकले. डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब भोरकडे, प्रतीक धनवटे, नीलेश दुरगुडे, ललित शिंदे आदींनी हे आंदोलन केले.