सशांची शिकार करणाऱ्या सहा जणांची कारागृहात रवानगी 

crime
crime

सोलापूर : वन्यप्राण्यांच्या शिकारीवर आळा घालण्यासाठी वन विभाग व नेचर कॉन्झर्वेशन सर्कलतर्फे माळरानावर गस्त घालताना रविवारी चिंचोळी परिसरात सशांची शिकार करणाऱ्यांना पकडण्यात आले होती. मंगळवारी दहा जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. चार जणांना जामीन मिळाले तर सहा जणांची कारागृहात रवानगी करण्यात आली असून त्यांना कोणती शिक्षा द्यायची याबाबत अद्याप न्यायालयाने आदेश दिले नाहीत, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव यांनी दिली. 

दहा जणांच्या टोळीने तीनशे मीटर लांबीचे जाळे ससे पकडण्यासाठी लावले होते. शिकाऱ्यांना चारही बाजूने घेरण्यात आले परंतु त्यातील चौघे पसार झाले. सहा जणांना पकडण्यात यश आले होते. त्यांच्याकडे पाच शिकार केलेले ससे मिळून आले होते. याप्रकरणात चौघे शिकारी वन विभागाच्या कार्यालयात हजर झाले. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सहा जणांची कारागृहात रवानगी केल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी जाधव यांनी दिली. 

ही कारवाई वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी निकेत जाधव, वनरक्षक रुकेश कांबळे, वनिता इंगोले, राजेंद्र बनसोडे, नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा, पप्पु जमादार, सोमानंद डोके, सुशांत कुलकर्णी, अमोल मिस्किन, बालाजी चंद्रबन्सी व सौरभ चेंडके आदींच्या पथकाने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com