डॉ. भरुड यांनी स्वीकारला पदभार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

सकाळी साडेअकराच्या सुमारास ते जिल्हा परिषदेमध्ये आले. त्यानंतर त्यांनी सर्व विभागप्रमुखांची ओळख करून बैठक घेतली.

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. राजेंद्र भरुड यांनी आज पदभार स्वीकारला. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते जिल्हा परिषदेमध्ये आले. त्यानंतर त्यांनी सर्व विभागप्रमुखांची ओळख करून बैठक घेतली.

त्यांनी यापूर्वी नांदेड जिल्ह्यात काम केले आहे. मूळचे धुळे जिल्ह्यातील असलेल्या डॉ. भरुड यांचा जन्म भिल्ल कुटुंबात झाला आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज त्यांच्या आधिपत्याखाली कसे होते, याकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.