मुख्यमंत्र्याचं गृहखातं काय करतय?: राजू शेट्टी

Raju Shetty
Raju Shetty

नगर : सरकार शेतकऱ्यांचे प्रश्‍न अत्यंत चुकीच्या आणि वाईट पद्धतीने हाताळत आहे. कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुख मागणाऱ्या व्यक्तीबाबत सरकारे फारसे गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्याला अटक केल्यावर फक्त एक दिवसाची पोलिस कोठडी मिळते याचा अर्थ काय, मुख्यमंत्र्याचे गृहखाते काय करतेय असा प्रश्‍न खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. भाजपशी कसल्याही प्रकारचा सबंध ठेवायचा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

तिसगाव (ता. पाथर्डी) येथे शेतकरी मेळाव्यासाठी आलेले खासदार राजू शेट्टी यांनी नगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, ऍड. ऋषीकेष डूचे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, सरकार, दुध, ऊस आणि अन्य मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. दुध उत्पादकांना कर्नाटकच्या धर्तीवर पाच रुपये प्रती लिटर अनुदान द्यावे आणि उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम मिळावी यासाठी 29 जून रोजी कैफियत मोर्चा काढला जाणार आहे. दुधाचे संकट हे नैसर्गिक नाही तर माणवनिर्मित आहे. शेतकरी हितासाठी ज्या ज्या वेळी स्वाभीमानीने शेतकरी हितासाठी लढा उभारला तर शिवसेनेने कायम पाठिंबा उभारला आहे. त्यामुळे सेनेने केंद्रात व राज्यात भाजपला सोडले तर त्यांच्याशी युती करण्याचा विचार आहे. कर्जमाफी म्हणजे फायदा कमी आणि मनस्तापच शेतकऱ्यांना जास्ती झाला आहे. आम्हाला शेतकरी प्रश्‍न महत्वाचे आहेत. त्यासाठीच लढा सुरु आहे.

तरच लोकांना विश्‍वास वाटेल..
खासदार राजू शेट्टी म्हणाले, ""शेतमालाला दिडपट हमीदर मिळावा आणि संपुर्ण कर्जमुक्ती यासाठी कायदा करावा म्हणून मी स्वतः खाजगी विधेयक मांडले आहे. पावसाळी अधिवेशनात ते लोकसभेत मांडून मंजुर होईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी सगळे विरोधीपक्षांनी साथ दिली आहे. मुळात केंद्र व राज्य सरकारने विश्‍वास गमावला आहे. पुन्हा शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करायचा असेल तर दिडपट हमी भाव आणि संपुर्ण कर्जमाफी या विधेयकाला मंजुरी देऊन कायदा केला तरच लोकांचा विश्‍वास संपादन करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com