नगरच्या पालकमंत्र्यांची हजारे यांच्याशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

राळेगणसिद्धी - लोकपाल आणि लोकायुक्त नेमण्याबाबत केंद्र सरकार आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात सकारात्मक चर्चा होण्याचा विश्‍वास पालकमंत्री राम शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला.

राळेगणसिद्धी - लोकपाल आणि लोकायुक्त नेमण्याबाबत केंद्र सरकार आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यात सकारात्मक चर्चा होण्याचा विश्‍वास पालकमंत्री राम शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला.

शिंदे यांनी हजारे यांची आज येथे येऊन भेट घेतली. या वेळी त्यांची बंद खोलीत विविध विषयांवर तासभर चर्चा झाली. केंद्र सरकारने लोकपाल व लोकायुक्त नेमण्याबाबत अंमलबजावणी केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, असा आरोप करीत दिल्ली येथे लवकरच आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज सायंकाळी ही भेट झाली.

राज्यात मागील अडीच वर्षांत झालेल्या "जलयुक्त शिवार'च्या कामांची माहिती व त्याचे झालेले फायदे मंत्री शिंदे यांनी हजारे यांच्या निदर्शनास आणून दिले. या कामांबाबत हजारे यांनीही समाधान व्यक्त करीत त्यातील त्रुटी दूर करण्याची सूचना केली. जलसंधारणाची कामे करताना गावपातळीवरील कार्यकर्ता, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे हजारे यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेत आणखी कोणती कामे करता येतील, याबाबतही उभयतांत चर्चा झाली.

राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी बुधवारी चर्चा करताना पालकमंत्री राम शिंदे.