अमर रहे... गोविंद पानसरे अमर रहे...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, ॲड. गोविंद पानसरे आणि प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ पकडावे, या मागणीसाठी आज बी. टी. कॉलेजपासून ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ झाला. शहीद गोविंद पानसरे, समता संघर्ष समितीतर्फे याचे आयोजन केले होते.

कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, ॲड. गोविंद पानसरे आणि प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ पकडावे, या मागणीसाठी आज बी. टी. कॉलेजपासून ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ झाला. शहीद गोविंद पानसरे, समता संघर्ष समितीतर्फे याचे आयोजन केले होते.

अमर रहे अमर रहे डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे, अमर रहे अमर रहे कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, अशा घोषणांनी आज सकाळी सातपासून शाहूपुरीचा गल्लीबोळ दुमदुमून गेला. सकाळी बी. टी. कॉलेजपासून मॉर्निंग वॉकला सुरवात झाली. मोजकेच पण सच्चे, कट्टर कार्यकर्ते या वॉकमध्ये सहभागी झाले होते. प्रकाश हिरेमठ यांनी शहिदांवर गाणीही सादर करून वॉकमध्ये आणखी जिवंतपणा आणला. तर शाहीर राजू राऊत यांनी शहीद भगतसिंग यांच्यासह क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित गीते गायली. पानसरे यांचे छायाचित्रे असलेली बॅनर होती. बी. टी. पासून शाहूपुरी चौथी गल्ली, नाईक ॲण्ड नाईक कंपनी, शाहूपुरी सहावी, आठवी, नववी गल्ली, कुंभार गल्ली अशा मार्गांवरून फिरून शाहूपुरीतील भास्करराव जाधव यांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला. सुरेश शिपूरकर यांनी भाषण करून मॉर्निंग वॉक कायम सुरू राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करून समारोप केला.

येथे दिलीप पोवार, व्यंकाप्पा भोसले, सुमन पाटील, सुमन घोसे, संजय पाटील, कृष्णात कोरे, रमेश वडणगेकर, अजय अकोळकर, एकनाथ माजगावकर, अरविंद आरेकर, प्रकाश कातवरे, शर्मिला भोसले, तनुजा शिपूरकर, सीमा पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर (सांगली) : राजू शेट्‌टींचा घसरलेला टीआरपी वाढविण्यासाठी ते माझ्यावर टीका करीत आहेत. त्यांनी अगोदर स्वतःच्या बुडाखालचा...

07.21 PM

पुणे / कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता राहील, असे विधान नुकतेच...

04.33 PM

सोलापूर : देवेंद्र फडणवीस होश मे आओ, पोलिस होश मे आओ, शाहू-फुले-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर या घोषणा देत सोलापुरातील समविचारांनी...

03.33 PM