भाजपचे नेते रामभाऊ चव्हाण यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

कोल्हापूर- भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते रामभाऊ चव्हाण (79) यांचे आज (सोमवार) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये निधन झाले. चव्हाण हे शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्रातील संस्थापक सदस्य होते. त्यानंतर भाजपमधील सक्रिय नेते होते. 

ग्रामीण भागातील तळागाळात शिवसेनेचे संघटन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी 20 वर्षे पद भूषविले. काही वर्षांपूर्वी जनसुराज्य पक्षाच्या वतीने त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती. ते वेताळ तरुण मंडळाचे अध्यक्ष होते. 