जवान माने यांच्यावर रामपूरवाडीत अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

कवठेमहांकाळ - जम्मू-काश्‍मीरमध्ये हिमस्खलनात मृत्युमुखी पडलेले लष्कराचे जवान रामचंद्र श्‍यामराव माने यांच्यावर बुधवारी रामपूरवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्या वेळी जनसमुदायाला अश्रू अनावर झाले.

लष्करी अधिकाऱ्यांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून माने यांना अखेरची मानवंदना दिली.

जम्मू-काश्‍मीरमध्ये माछील भागात हिमस्खलनात रामपूरवाडीचे जवान माने सोमवारी मृत्युमुखी पडले. आज सकाळी साडेआठच्या सुमारास श्री महांकाली कारखान्याच्या क्रीडांगणावर भारतीय वायुसेनेच्या खास हेलिकॉप्टरने त्यांचे पार्थिव आणले. तेथून रुग्णवाहिकेतून ते रामपूरवाडी येथे नेले. गावात ट्रॅक्‍टरमधून अंत्ययात्रा काढली होती. राज्य सरकारतर्फे पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. चीफ ऑफ आर्मी स्टाफचे कर्नल व्ही. पी. शिंदे, लष्कराच्या दक्षिण विभागाचे कॅप्टन रॉबिन इब्राहिम, सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले यांनीही पुष्पचक्र अर्पण केले.