आमदार कदम यांचा जामीन अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सोलापूर - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणात महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांनी मंगळवारी फेटाळला

सोलापूर - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील अपहार प्रकरणात महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज न्यायदंडाधिकारी पंकज बिदादा यांनी मंगळवारी फेटाळला

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयातून 11 लाख 75 हजार रुपये सुनील सुभाष चव्हाण या नावाने सोलापूर कार्यालयाला पाठविले होते. ती रक्कम आमदार कदम यांच्या मोहोळ येथील कार्यालयात काम करणाऱ्या सुनील बचुटे याने काढून घेऊन वाहन खरेदी केले होते. या गुन्ह्यात बचुटेसह आठ जणांवर गुन्हा दाखल आहे. चौकशीदरम्यान महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनाही आरोपी करण्यात आले होते.

सोलापूर आर्थिक गुन्हे शाखेने 30 डिसेंबर रोजी सोलापूरच्या न्यायालयात त्यांना हजर केले होते. त्यांची दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली होती. या गुन्ह्याशी माझा संबंध नाही, मला जामीन मिळावा, अशी मागणी आमदार कदम यांनी न्यायालयात केली होती. सोमवारी सोलापूर जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी आमदार कदम यांनी स्वत: युक्तिवाद केला होता. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आमदार कदम यांचा जामिनाचा अर्ज फेटाळला आहे.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : गेली काही वर्षे रेंगाळलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर...

03.21 PM

कऱ्हाड : शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली. पालिकेचे चार अधिकारी व पन्नास कर्मचारी त्यात सहभागी...

01.00 PM

श्रीगोंदे, (जिल्हा नगर) : क्रूरकर्मा नराधमाने पाच वर्षांचा कोवळ्या जीवाच्या शरीराची विटंबना केली. एकदा नव्हे अनेकदा तिच्यावर...

मंगळवार, 15 ऑगस्ट 2017